फेसबुकच्या रिलायन्समध्ये केलेल्या गुंतावानुकीपाठोपाठ आता Ecommerce क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी कंपनी Amazon सुद्धा भारतामध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या अनुसार ही गुंतावाकून अमेझोन भारती एअरटेल केली जाणार आहे.
Amazon to Invest in Bharti Airtel; Amazon करू शकते या भारतीय कंपनीमध्ये २ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
कसा असेल नेमका Airtel आणि Amazon मधला करार?
देशामध्ये लॉकडाऊन असतानाही गेल्या महिन्यामध्ये मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी फेसबुक सोबतच्या करारामुळे चर्चेमध्ये होती . या करारामुळे भारतीय शेअर बाजार सुद्धा तेजीमध्ये आलेला आपण पहिला. पण सध्या चर्चा अशाच एका होऊ घातलेल्या कराराची आहे.
हा करार आहे जगातील सर्वात मोठी Ecommerce company Amazon आणि भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी Bharti Airtel यांच्यामध्ये होणार आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अमेझॉन एअरटेलमध्ये २ अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक करून Airtel कंपनी मधील आता पर्यंतचा सर्वात मोठा हिस्सा खरेदी करू शकते.
अमेझोन आणि एअरटेल मधील हा करार झाला तर अमेझोन एअरटेल मधील ५ टक्के शेअर्स खरेदी करू शकते. एअरटेलचे सध्या भारतामध्ये ३० कोटी ग्राहक आहेत.
याचाच फायदा अमेझोन आपल्या भारतीय ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करू शकते.शिवाय जिओ कडून निर्माण झालेल्या स्पधेमुळे एअरटेलला देखील भारतीय बाजार पेठेमध्ये नवीन उभारी मिळेल.
अमेझोनचे स्पष्टीकरण;
रॉयटर्सनुसार एअरटेल आणि अमेझॉन यांच्यात कराराची चर्चा प्राथमिक अवस्थेत आहे. सध्या ही चर्चा गोपनीय आहे. आम्ही भविष्यात काय करणार आहोत आणि काय नाही याबद्दल कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करत नाही, असे अमेझॉनच्या प्रवक्त्याने सांगितले.
जरी अमेझोन ने या करारा संदर्भात सध्या तरी गोपनीयता बाळगली असली तरी भारतीय बाजारपेठेत लवकरच नवी परदेशी गुंतवणूक येणार आहे हे नाकारता येत नाही.
याचाच फायदा पुन्हा एकदा भारतीय शेअर गुंतवणूकदारांना होऊ शकतो.
Post a Comment