महायश धर्मपाल गुलाटी यांची यशोगाथा ; Mahashy Dharmpal Gulati Success Story  



टीव्हीवर एमडीएच मसाल्यांची जाहिरात तुम्ही पाहिलीच असेल. या जाहिरातीमध्ये तुम्ही मसाले किंग म्हणून ओळखले जाणारे महाशय  धरमपाल गुलाटी पाहिले असतीलच . मसाला किंग धर्मपाल गुलाटी आज नव्वदीतही अगदी उत्साही जीवन जगत आहेत. जगभरात आपल्या मसाल्यांच्या चवसाठी ओळखल्या जाणार्‍या धर्मपाल गुलाटी यांचे आयुष्यही खुप उतार चढावांचे राहिले आहे. 

महायश धर्मपाल गुलाटींना २०१९ चा पदमविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे . आज आपण त्यांच्या   आयुष्यातील चढ उतार आणि  उद्योजकीय जीवनाचा प्रवास जाऊन घेऊ. मराठी नवं उद्योजकांना नक्कीच त्यांचा जीवन प्रवास प्रेरणादाई ठरेल . 


सियालकोट ते दिल्ली प्रवास 

Source- hindi.oneindia

महाशय धर्मपाल गुलाटी पाकिस्तान  जन्म पाकिस्तान मधील  सियालकोट येथे १९२३ साली झाला.  महाशय धर्मपाल गुलाटी यांचे वडील मुन्सीयूर चुन्नीलाल यांचे  सियालकोट येथे 'मॉन्सीउर दी हट्टी' नावाचे मसाल्याचे दुकान होते.  जेव्हा भारत पाकिस्तान ची फाळणी झाली तेव्हा इतर विस्थापितांसारखंच तेजीमध्ये चालणार मसाल्याच्या व्यवसाय जागेवर सोडून सियालकोटहून दिल्लीतील करोल बाग येथे स्थायिक व्हावे लागले.

दिल्लीमध्ये आल्यावर उदरनिर्वाहासाठी काही ना नाही करणे गरजेचे होते परंतु मसाला बनविणे आणि विकण्या व्यतिरिक्त त्यांना काही येत न्हवते . दिल्ली मध्ये नवीन ठिकाणी व्यवसाय सुरु करण्याइतके भांडवल नसल्याकारणाने त्यांच्याजवळ असलेल्या तुटपूंच्या पैश्यातुन त्यांनी एक टांगा गाडी विकत घेतली आणि दिल्लीच्या रस्त्यावर प्रवाश्याना सोडण्याचं काम सुरु केलं . परंतु या व्यवसायामध्ये त्यांचं काही मन रमत न्हवत आणि शिक्षण खूप कमी असल्यामुळे नोकरी करणे कि शक्य न्हवतं. 

कसे बनले भारताचे मसाले किंग 

Source -prforbes.com

लवकरच त्यांनी टांगा चालवण्याचं काम सोडून आपला मसाले बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय करण्याचं ठरवलं आणि १९५९ दिल्लीमध्ये करोल बागेत 'महाशिया दी हट्टी' नावाचे मसाल्याचे दुकान चालू केले. बांधता बघता त्यांचा प्रामाणिकपणा  आणि  मेहनत फळास आली आणि त्यांचा छोटासा मसाल्याचा कारखाना MDH मसाले नावाने प्रसिद्ध झाला . बघता बघता MDH मसाले ३० पेक्षा अधिक देशांमध्ये मसाले एक्स्पोर्ट करू लागले. 

आज MDH मसालेचे देशात १५ पेक्षा अधिक कारखाने आहेत आणि करोडो लोक MDH चे ग्राहक. १००० कोटी पेक्षा अधिक संपत्तीचे मालक असलेले महाशय धर्मपाल गुलाटी हे स्वतः आपल्या MDH ब्रँडचे ब्रँड अँबॅसिडर आहेत . भारतामध्ये त्यांची ओळख मसाले किंग म्हणून आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post