लॉकडाऊन नंतर घरांच्या किमती कमी होतील का? जाणून घ्या स्पेशल रिपोर्ट; 


Source-webstockreview


            मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या लोकांचे स्वताचे घर खरेदी करणे हे एक स्वप्न असते. यावर्षी म्हणजे २०२० च्या सुरवातीला जे लोक नवीन घर खरेदीच्या तयारीत होते त्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपले घर घेणे पुढे ढकलावे लागले.

लॉकडाऊन मुळे आज इमारतींची बांधकामे पूर्णतः थांबली आहेत. बांधकाम व्यवसायिक प्रचंड अडचणीत सापडले आहेत. बांधकाम व्यवसायातील बऱ्यापैकी कामगार हे स्तलांतरित झाले आहेत.

आता अशा कठीण परिस्थितीत अनेक घर खरेदीदारांना एक संधी उपलब्ध होईल अस वाटत आहे. पण करोनाच्या प्रादुर्भावानंतर लागू झालेल्या टाळेबंदीमुळे घरांच्या किमती कमी होतील, अशा भ्रमात असलेल्या घर खरेदीदारांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

                विकासकांचे नेतृत्त्व करणाऱ्या संघटनांच घरांच्या किमती कमी न करता विकासकांनी घर खरेदीदारांना इतर सवलती कशा देता येतील, यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे हा सल्ला जर विकासकांनी मानला तर घरच्या किमती कमी होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

महाराष्ट्र चेंबर्स ऑफ हौसिंग इंडस्ट्रीज(MCHI)_ कॉन्फर्डेशन ऑफ रिएल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन (CREDAI) या संघटनेने केलेल्या सर्वेक्षणानुसार फक्त घरांच्या किंमतीमध्ये कमी न करता बांधकाम व्यावसायिकांनी अधिकाधिक नफा कसा मिळवता येईल याकडे ही लक्ष्य देण्याचा सल्ला दिला आहे.

MCHI_Credai ने सदर केलेला हा अहवाल हा केवळ Real Estate Developers साठी केवळ अंतर्गत वापरासाठी आहे असे MCHI_Credai चे अध्यक्ष नयन शहा यांनी स्पष्ट केले.

काय आहे नेमक MCHI_Credai च्या या अहवालामध्ये ?  


बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेता MCHI_Credai ने सर्वेक्षण करून विकासकांनी लॉकडाऊन शिथिल झाल्या नंतर कशा पद्धतीने बांधकाम क्षेत्राची पुन्हा  सुरवात करावी या संदर्भात काही सूचना केल्या आहेत.

MCHI_Credai ने सर्वेक्षणानंतर जो अहवाल सदर केला आहे त्यामध्ये मुख्यता रिअल इस्टेट व्यावसायिकांना काही सल्ले दिले आहेत . ते आपण जाऊन घेऊ.

बाधकाम व्यावसायिकांनी जाहिरातीवर कमीत कमी खर्च करावा.
ब्रोकर सेलिंग पेक्षा ग्राहकांना डायरेक्ट होम सेलिंग करून ब्रोकरेज वाचवावा.
ब्रोकरेजची रक्कम ग्राहकांना सवलत म्हणून द्यावी.
विकासकांनी घरांच्या विक्री एवजी अपूर्ण बांधकाम पूर्ण करावी.
ताबा कधी मिळणार याबाबत घर खरेदीदारांना खरीखुरी तारिख सांगावी.

अशा प्रकारे सर्वेक्षनानातर MCHI_Credai ने विकासकांना काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. या सर्वेक्षणामध्ये एकूण ५०० विकासकांचा समावेश होता.

Post a Comment

Previous Post Next Post