Flipkart वर विक्रेता कसे बनतात ? 


जाणून घ्या Flipkart वर विक्रेता कसे बनतात. जर तुम्हालाही तुमचा Business online करून  भरपूर कमाई करायची असेल तर हा लेख फक्त तुमच्या साठी आहे. जाणून घ्या How to sell Products on Flipkart online. Information in Marathi. 

सध्या महाराष्टातील मराठी तरुण वर्ग निरनिराळ्या व्यवसायामध्ये आपले हात आजमावत आहे. अगदी Product Manufacturing पासून ते Online product selling मध्ये सुद्धा. आपल्यापैकी अनेक नंव उद्योजकांना हे जाणून घ्यायचे असते की  Flipkart सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर  वस्तूंची विक्री कशी करतात.

 How to sell Products on Flipkart; how to register on Flipkart seller account; Information in Marathi

आज संपूर्ण देश हा डिजिटल झाला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून लोक आपल्या बऱ्याच गरजा पूर्ण करत आहेत. जसे की, Banking , Communicating, Reading , Entertainment इत्यादी. याच बरोबर अजून एक मुख्य क्षेत्र इंटरनेटमुळे सगळ्यात जास्त प्रभावित झाले आहे ते म्हणजे Product buying &  selling. यालाच आपण Ecommerce असे म्हणतो. 

भारतीय बाजारपेठे मध्ये अनेक छोट्या मोठ्या कंपन्या इंटरनेटच्या माध्यमातून वस्तू विक्री खरेदी मोठ्या प्रमाणात करत आहेत. Amazon , Flipkart , Snapdeal , Tata cliq , myntra , यासारखे अनेक online platforms आज भारतामध्ये कार्यरत आहेत.  

या सर्व  shopping websites मध्ये Flipkart एक प्रमुख वेबसाईट आहे. यामुळेच आपल्यातील  प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे की , Flipkart वर विक्रेता कसे बनतात ?(How to become seller on on Flipkart in Marathi )  

फ्लिपकार्ट म्हणजे काय? What is Flipkart ? 

फ्लिपकार्ट ही भारतातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स साइट पैकी एक आहे. फ्लिपकार्टचा २०१९ च्या आर्थिक वर्षांमधला एकूण टर्नओवर ₹42,878 कोटी इतका आहे. या वरूनच आपल्याला फ्लिपकार्टच्या   भारतीय  बाजारपेठेतील व्यापकता लक्ष्यात येते. Flipkart ची सुरवात सचिन बन्सल यांनी २००७ मध्ये केली होती. 

आज  Flipkart ची मालकी Wallmart या अमेरिकन कंपनीकडे आहे.

Flipkart Seller Account बनवण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्याल ? 

१. Flipkart Seller Account बनवण्यापूर्वी आपल्याकडे TAN( (Tax Deduction and Collection Account Number) असणे आवश्यक आहे. 

२. जर तुमच्याकडे  TAN असेल तर दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे GST नंबर. 

३. जर तुम्ही आपले प्रोडक्ट Flikart वरून सेल करू इच्छित असाल तर तुम्हाला तुमच्या वस्तूच्या एकूण किमतीमधून काही कमिशन हे Flipkart ला द्यावे लागते.  Flipkart  commission payकोम्मिस्सिओन सोबतच तुम्हाला Shipping Charges पण द्यावे लागते. 

आता आपण जाणून घेऊ  Flipkart seller कसे बनतात; How to Register for Flipkart Seller Account ?

१.   सर्वात प्रथम तुम्ही आपल्या Pc किंवा Mobile मध्ये seller.flipkart.com ही वेबसाईट उघडा. 

२.  यानंतर तुमच्या समोर एक Dashboard Open होईल. तिथे तुम्ही मोबाईल क्रमांक भरून नोंदणीकृत व्हावे लागेल. 




३. त्यानंतर समोर आलेल्या सर्व रकान्यामध्ये खालील आवश्यक माहिती भरा.
  • नाव 
  • इमेल आयडी 
  • Flipkart Seller Account Password 
  • तुमचा मोबाईल क्रमांक ( Send OTP बटन वर करून तुमचा मोबाईल व्हेरीफाय करा )
४. त्यानंतर तुम्ही Continue  बटनवर  क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या एरियाचा पिन कोड आणि पत्ता भरून सबमिट करावे लागेल. 

५. अशा प्रकारे तुमचे Flipkart Seller Account तयार होईल. त्यानंतर तुमच्या Email Account वर एक  व्हेरिफिकेशन इमेल येईल. त्यावर क्लिक करून व्हेरीफाय करा. 


अशा प्रकारे तुमचं Flipkart Seller Account पूर्णतः तयार होईल.

Flipkart Seller Account  तुमचे प्रोडक्ट लिस्ट करण्यासठी खालील स्टेप्स फॉलो करा. How to list Products on Flipkart Seller Account?

१. सर्वप्रथम तुम्ही Flipkart Seller Account ला लॉग इन करा. आणि त्यानंतर तुमच्यासमोर एक Dashboard Open होईल. 

२ . त्यामध्ये तुम्हला तुमच्या व्यवसायासंबंधी माहिती(Business details) भरावी लागेल. 

नोट - Business Detials मध्ये तुमच्या व्यवसायाचा TAN आणि GST संदर्भातली माहिती भरावी लागेल. 

३. त्यानंतरच्या रकान्यामध्ये तुम्हाला तुमचे बँक डीटेल्स आणि स्टोर डीटेल्स भरवे लागतील. 

४. वरील सर्व डीटेल्स भरून झाल्यावर  Dashboard वर जाऊन Add Listing मेन्युवर क्लिक करून तुमच्या वस्तूंची विक्रीसाठी नोंदणी करावी.  त्यानंतर थोड्याच वेळामध्ये तुमचे प्रोडक्ट Flipkart  च्या वेबसाईट वर Online selling साठी उपलब्ध होतील. 


 आज आपण काय शिकलात ;


How to sell Products on Flipkart online या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत एक महत्वपूर्ण माहिती आणण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला अशा आहे कि अनेक तरुण उद्योजक यातून प्रेरणा नक्कीच घेतील.  आणि आपल नेहमीच्या विक्री व्यवसाय online करून अधिक ग्राहक व अधिक नफा नक्कीच मिळवतील. 


तुम्हालाही जर आमचा हा लेख आवडला असेल तर Comment box च्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. त्याचबरोबर शेअर बटन वर क्लिक करून WhatsApp, Facebook, किंवा  Twitter वर शेअर करायला विसरू नका. 

Post a Comment

Previous Post Next Post