जिओ मार्ट म्हणजे काय ? What is jio Mart?

Jio Mart एक Online To Offline (O2O) E-Commerce Platform आहे. ग्राहक या प्लॅटफॉर्म वर ऑनलाईन ऑर्डर करू शकतात पण वस्तू  खरेदी मात्र ऑफलाईन होते (स्थानिक किरकोळ स्टोअर मधुन ).

Source-sirfnews


अगदी  सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर जिओ मार्ट (Jio Mart )  म्हणजे तुमच्या शेजारील किराणा मालाचे दुकान किंवा स्टेशनरी चे दुकान आणि ग्राहकांना ऑनलाईन जोडणारे एक माध्यम आहे. Jio Mart हे मुकेश अंबानींच्या Reliance Industries Limited (RIL) चे नवीन व्हेन्चुअर (Venture) आहे. जिओ मार्टमध्ये Zark Zuckerberg यांच्या Facebook कंपनीचे ९. ९९ % शेअर्स आहेत. 

जिओ मार्ट मधून खरेदी करण्यासाठी WhatsApp च्या माध्यमातून ग्राहक आवश्यक उत्पादनाची ऑर्डर करू शकतात. 

जिओ मार्टची थोडक्यात माहीती ;

Parent Company
Reliance Industries Limited (RIL)
Function
E-Commerce Platform (Online2Offline)
Products
50000 products including Grocery, House-hold & Stationary Items etc.
Official Website
www.jio.com/jiomart
WhatsApp No
88500 08000 


जिओ मार्ट कुठे उपलब्ध आहे ? 


सध्या जिओ मार्ट हे प्रायोगिक तत्वावर मुंबई जवळ . ठाणे , कल्याण आणि नवी मुंबईच्या काही भांगांमध्ये Active आहे. परंतु रिलायन्स लवकरच ही सुविधा संपूर्ण देशभर सुरु करणार आहे. 

Jio Mart ची टॅग लाईन काय आहे ? 

देश कि  नई दुकान 

Jio Mart Distributorship साठी कोणती Documents आवश्यक आहेत ? Documents require for Jio Mart Distributorship;   

Jio Mart Distributorship मिळवण्यासाठी खालील कागदपत्रे आपल्याजवळ असणे आवश्यक आहे .

  • २ पासपोर्ट आकाराचे फ़ोटोग्राफ 
  • Voter Id  किंवा Aadhaar Card ची Xerox Copy 
  • Address  proof Documents 
  • Pan Card 
  • Firm Certificates 
  • GST Registration Number 

Jio Mart Distributorship Registration कसे करतात ?

 आपण जर छोटे व्यापारी असाल तर साहजिकच आपल्याला आपल्या मालाची विक्री जास्तीत जास्त व्हावीअसे वाटत असणार. परंतु यासाठी तेवढी मोठी बाजारपेठ तुमच्या बाजूला असणे आवश्यक आहे   

ज्या पद्धतीने जिओने टेलिकॉम क्षेत्रामध्ये ग्राहकांसाठी क्रांतिकारक परिवर्तन आणले आणि स्वस्त दरामध्ये Internet आणि Calling ची सेवा उपलब्ध करून दिली त्याच प्रमाणे जिओ मार्टच्या माध्यमातून ३ करोड किरकोळ दुकानदारांना (Retailers) आणि २० करोड ग्राहकांना  जोडन्याचा मानस Reliance Jio Mart चा आहे. 

तुम्हाला देखील जिओ मार्ट सोबत व्यावसायिक भागीदारी करायची असेल तर  खालील सूचनांचे अनुक्रमे पालन करून Jio Mart चे पार्टनर होऊ शकता. आणि  तुमच्या Retail shop मधुन ऑनलाईन विक्री करू शकता. 

१. प्रथम तुम्ही Jio Mart च्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्या . 
                             इथे क्लिक करा 

२. नंतर आपल्यासमोर एक Page ओपन होईल. त्यावरच्या Terms & Conditions वाचून I am interested
बटन वर क्लिक करा. 

Jio Mart Registation Page

३.  त्यानंतर एक वैयक्तिक माहितीचा फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये तुमची संपूर्ण माहीती भरा. 


४.त्यानंतर Text Verification box मध्ये CAPTCHA CODE भरून  Submit बटन वर क्लिक करा . 

५. त्यानंतर तुम्हाला एक संदेश दिसेल, तुमची लीड यशस्वीरित्या तयार झाली आहे. 

अशा प्रकारे तुम्ही JioMart साठी Registration करून तीन खालील ३ प्रकारांपैकी एक  प्रकारचा पार्टनर होऊ शकता. 

  • Distributor  
  • Prefered Retailers 
  • Retailers 

Jio Mart चे वितरक का व्हावे ?


तुम्हाला नक्कीच हा प्रश्न पडला असेल की जिओ मार्ट डिस्ट्रिब्युटर बनण्याची आवश्यकता का आहे. खरंतर भारतीय बाजार पेठ ही  एका बदलाच्या उंभरठ्यावर आहे. Fipkart , Amezon , Snapdeal , Tata Cliq , Big Basket अशा अनेक ऑनलाईन Ecommerce Platforms मुळे भारतीय ग्राहक ऑनलाईन खरेदीकडे वळले आहेत. 

Jio Mart चे पार्टनर बनून तुम्ही या  ऑनलाईन बाजारपेठेला टक्कर देऊ शकता. 

मुकेश अंबानी हे एक द्रष्टे उद्योजक आहेत. खरंतर त्यांनी  Jio Mart च्या माध्यमातू भारतातील ३ कोटी किरकोळ दुकानदारांना प्रगतीचे नवीन प्रवेशद्वार खुले  करून दिले आहे. 


Jio Mart सोबत व्यवसाय करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी ?


१. जिओ मार्टच्या माध्यमातून विक्रीसाठी नामांकित ब्रॅन्ड अथवा उत्तम दर्जाची उत्पादनेच निवडावीत. 

२ . तुमच्याकडे आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. 

३. वितरकांशी तुमचे  चांगले संबंध असणे आवश्यक आहे. 


 आपण आज काय शिकलात

आम्हाला अशा आहे जिओ मार्ट चे  वितरक कसे व्हावे हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आपल्या  वाचकांना आणि नवं उद्योजकांना जिओ मार्ट  संदर्भामध्ये संपूर्ण माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरून तुम्हाला इतरत्र कोठेही माहितीसाठी न भटकता तुमचा बहुमूल्य वेळ वाचवता येईल. 

जर तुम्हाला Jio Mart विषयी आमची पोस्ट आवडली असले तर कंमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. आणि जर तुम्हाला यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया शेअर बटन वर क्लिक करून WhatsApp , Facebook  किंवा Twitter  वर पाठवायला विसरू  नका. 


1 Comments

  1. मला डिस्टरबुर बनायचे आहे

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post