PMKVY; प्रधानमंत्री कौशल योजना म्हणजे काय ?
पंतप्रधान कौशल विकास योजना (PMKVY ) ही राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने राबविलेली कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालया मार्फत चालवली जाणारी (एमएसडीई) प्रमुख योजना आहे . PMKVY चे उद्दीष्ट म्हणजे देशातील तरुणांना उद्योगांशी संबंधित कौशल्य प्रशिक्षण देणे, जेणेकरुन त्यांना रोजगार मिळू शकेल...
PMKVY |
जे लोक कमी शिक्षित आहेत, अशिक्षित आहेत किंवा पदवीधर आहेत आणि कौशल्याअभावी चांगली नोकरी मिळवू शकत नाहीत त्यांना या योजनेंतर्गत आपल्या पसंतीच्या क्षेत्रात प्रशिक्षण घेऊन रोजगार मिळवता येऊ शकेल. या योजनेचा लाभ घेणाऱ्या विदयार्थ्यांच्या प्रशिक्षणाची फी देखील भारत सरकारकडून भरली जाते. त्याच बरोबर त्यांना प्रशिक्षित करून निरनिरळ्या क्षेत्रामध्ये नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठीची संधी उपलब्ध करून दिली जाते . या लेखाच्या माध्यमातून आम्ही PMKVY विषयी सविस्तर माहिती देणार आहोत.
PMKVY योजनेची सुरवात कधी झाली ?
PMKVY योजनेची सुरवात २० मार्च २०१५ रोजी झाली.
PMKVY योजनेचे व्यवस्थापन कोणत्या मंत्रालयाकडून केलं जात ?
Ministry of Skill Development & Entrepreneurship (MSDE)
वेबसाईट - www.pmkvyofficial.org
PMKVY च्या अंतर्गत कोणत्या आभ्यासक्रमांचं प्रशिक्षण दिल जात ?
शेती, वस्त्र, सौंदर्य आणि निरोगीपणा, इलेक्ट्रॉनिक्स, किरकोळ इ.
प्रशिक्षणाचा कालावधी - कोर्सनुसार 150 ते 300 तास
प्रशिक्षण कुठे असेल ?
प्रशिक्षण केंद्रावर (टीसी) उमेदवाराच्या निवडलेल्या कोर्स आणि स्थानानुसार.
PMKVY योजनेचे इतर फायदे काय आहेत ?
प्रमाणित उमेदवार पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत मॅप केले जातील. स्वत: चा व्यवसाय सुरू करण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमातूनही कर्ज दिले जाते.
हेल्पलाइन नंबर- 1. विद्यार्थी हेल्पलाइन: 8800055555
2. स्मार्ट हेल्पलाईन: 18001239626
3. एनएसडीसी टीपी हेल्पलाइन: 1800-123-9626
PMKVY; प्रधानमंत्री कौशल योजने विषयी थोड्यात माहिती ;
भारतासारख्या १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये कुशल कामगारांची संख्या खूपच कमी आढळते. याचाच परिणाम हा देशातील एकूण उत्पादक क्षमतेवर होतना दिसतो. याच बरोबर भारतामध्ये औपचारिक शिक्षण घेऊन देखील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात कौशल्य विकासाअभावी बेरोजगारअसल्याचा आढळतो. यामुळेच कौशल विकास योजना (PMKVY ) ही भारत सरकारच्या प्रमुख योजनेपैकी एक योजना बनली आहे. मोठ्या संख्येने भारतीय तरूणांना विनामूल्य कौशल्य प्रशिक्षणाद्वारे सक्षम करणे जेणेकरुन त्यांना रोजगार मिळू शकेल आणि त्यांचे जीवनमान सुस्थितीत आणने हे या योजनेचे उद्दीष्ट आहे.
कौशल विकास योजनेचं प्रशिक्षण हे अनेक पब्लिक ट्रैनिंग सेंटर्सच्या माध्यमातून दिले जाते. अशा सेंटर्समध्ये थेअरी आणि प्रॅक्टिकल्स दोन्ही प्रकारचं प्रशिक्षण दिले जाते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्याचे मूल्यांकन करून प्रमाणपत्र देखील दिले जाते. मूल्यांकनाला बसण्यासाठी उमेदवाराची कार्यशाळांमध्ये उपस्थिती ७०% असणे अनिवार्य समजली जाते.
PMKVY योजनेचे विभाग
प्रधानमंत्री कौशल विकास योजना ३ विभागामध्ये विभागली जाते
१. शॉर्ट टर्म ट्रैनिंग ; Short Term Training
शॉर्ट टर्म ट्रैनिंग अंतर्गत अशा लोकांना प्रशिक्षित केले जाते ज्यांनी आपले शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले नाही. या अंतर्गत छोट्या उद्योजकांना आर्थिक आणि डिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण दिले जाते. नोकरीच्या भूमिकेनुसार याचा कालावधी १५० ते ३०० तासापर्यंत असू शकतो.
२. पूर्व शिक्षणाची मान्यता – Recognition of Prior Learning (RPL)
ज्यांनी स्वतःहून प्रशिक्षण घेऊन किंवा उद्योगाशी संबंधित काम करून कौशल्य संपादन केले आहे त्यांचे मूल्यांकन केले जाते आणि Recognition of Prior Learning (RPL) अंतर्गत प्रमाणपत्र दिले जाते . या योजनेमुळे देशातील असंघटित कुशल कामगाराची नोंद ठेवणे सोपे जाते आणि त्यांना योग्य रोजगार संधी उपलब्ध करून देणे सोईस्कर होते.
३. विशेष प्रकल्प;Special Projects
विशेष प्रकल्प हा PMKVY चा एक घटक आहे, ज्या अंतर्गत NSQC ने मंजूर केलेल्या कामांच्या संदर्भात उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते.
या घटकाची प्रमुख वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत
- समाजातील दुर्लक्षित लोखसंख्येचा भाग अशा प्रोजेक्ट साठी पात्र असतो
- संस्थात्मक सेटिंग्ज उदा. कारागृह परिसर, राज्यपालांचे निवासस्थान, राष्ट्रपतींचे राज्य इत्यादी सरकारी संस्थांचे परिसर.
योजनेचे फायदे - Benefits of PMKVY
१. बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, फूड प्रोसेसिंग, फर्निचर, फिटिंग्ज, हस्तकला, रत्ने व दागिने व लेदर तंत्रज्ञान यासारख्या योजनेंतर्गत जवळपास 46 क्षेत्रे देण्यात आली आहेत.
२. उमेदवारांना मोफत प्रशिक्षण, ड्रेस व अभ्यासाचे साहित्य दिले जाते.
३ यशस्वी उमेदवारांना कौशल्य प्रमाणपत्र दिले जाते.
४. या योजनेच्या माध्यमातून महिलांना सर्वसमावेशकतेसाठी कुशल केले जात आहे.
५. उमेदवारांकडून मूल्यमापन व प्रमाणपत्रासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
६. पंतप्रधान मुद्रा योजनेद्वारे कर्ज घेण्याची संधीमिळते . जेणेकरुन उमेदवार स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकेल.
७. कौशल्य प्रमाणपत्र संबंधित कौशल्याच्या क्षेत्रातील नोकरीच्या पुढील स्तरावर वापरले जाऊ शकते.
८. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) अंतर्गत अपघाती मृत्यू / कायमस्वरूपी अपंगत्व यासाठी 2 लाखांची विमा रक्कम कुशल उमेदवारांना तीन वर्षांसाठी देण्यात येते. बिमाचा प्रीमियम NSDC थेट NIAला देते. प्रमाणित उमेदवारांना ही सुविधा विनाशुल्क दिली जाते .
९. डिजीलोकर सुविधा देखील पुरविली गेली आहे. डिजिटल लॉकर; डिजिटल इंडिया हा या योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे ज्यायोगे उमेदवार जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, शैक्षणिक प्रमाणपत्र यासारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाइन ठेवू शकतात. आणि PMKVY द्वारे प्राप्त केलेली सर्व कागदपत्रे या लॉकरमध्ये स्वयंचलितपणे संग्रहित केली जातात.
PMKVY साठी नोंदणी कशी करतात ?How to register for PMKVY ?
- भारत सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
- त्यासाठी तुम्हाला www.pmkvyofficial.org या वेब साईटवर जाऊन स्वतःची नोंदणी करणे आवश्यक असते. नोंदणी फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचे नाव , ई-मेलआयडी, मोबाइलला क्रमांक आणि पत्ता भरणे अनिवार्य आहे .
- फॉर्म भरल्यानंतर, अर्जदारास ज्या तांत्रिक क्षेत्रामध्ये प्रशिक्षण घ्यायचे आहे ते निवडणे आवश्यक आहे. पीएमकेव्हीवाय मध्ये बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर, फूड प्रोसेसिंग, फर्निचर अँड फिटिंग, हॅन्डिक्रॉफ्ट, रत्ने व ज्वेलरी आणि लेदर टेक्नॉलॉजी अशी जवळपास 40 तांत्रिक क्षेत्रे आहेत.
- पीएमकेव्हीवाय मध्ये, प्राधान्यकृत तांत्रिक क्षेत्राचे अतिरिक्त तांत्रिक क्षेत्र देखील निवडावे लागेल. ही माहिती भरल्यानंतर आपल्याला आपले प्रशिक्षण केंद्र निवडावे लागेल.
सध्या संपूर्ण देशामध्ये २२५५० PMKVY ची सेंटर्स आणि १४१ ट्रैनिंग पार्टनर्स उपलब्ध आहेत. देशात २०१६ ते २०२० या कालावधीमध्ये एकूण ३३ लाख उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा निरनिराळ्या क्षेत्रामध्ये कौश्यल्य विकास करून उत्तम नोकरी अथवा स्वतःचा व्यवसाय उभारून आत्मनिर्भर होऊ शकता.
तुम्हाला जर आमचा लेख आवडला असेल तर कॉमेंट बॉक्स च्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा . शेअर बटन वर क्लिक करा . तुमच्याकडून काही सूचना किंवा सल्ला असेल तरीही आपले स्वागत आहे.
Thank You, खूपच छान आणि उपयोगी माहीती. उद्योग गाईड वर अशी माहीती मला नेहमी वाचायला आवडेल.
ReplyDeleteआभारी आहे सर , तुम्हला उद्योगाशी संबंधित Information हवी असेल तर कृपया खालील ई-मेल आयडी वर संपर्क करा
ReplyDeleteinfo.udyogguide@gmail.com
Post a Comment