डाऊनलोड करा मोफत प्रोजेक्ट रिपोर्ट शेळीपालन व्यवसायासाठी; Download Goat Farming project report for free
पशुपालन हा व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो. छोट्या शेतकऱ्यांसाठी तर शेतीच्या तुटपुंज्या उत्पन्नामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे शक्य नसते. अशावेळी अतिशय कमी गुंतवणुकी मध्ये पशुपालन हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध असतो . गायीम्हशींचे , शेळ्यांचे संगोपन करण्याकडे शेतकरी जास्त भर देतात.
ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घरामध्ये आपल्याला पाळीव प्राणी पाहायला मिळतात. अतिशय कमी गुंतवणुकीमुळे सहसा लोक शेळी पालनाचा पर्याय निवडतात. सध्या पाहिल्यासारखं लोकांना माळरानांवर बकरी चारणे आणि संगोपन करणे शक्य होत नाहीय.
यातूनच शेळीपालना संदर्भात तरुणाच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले आहेत.
१. बंदिस्त शेळी पालन करावे का ?
२. सुरवातीला किती शेळीचे पालन करावे ?
३. शेळीपालनासाठी किती आर्थिक गुंवणूक लागेल ?
४. व्यावसायिक दृष्टिकोनातून शेळीपालन केल्यास नफा मिळवता येईल का ?
५. शेळीपालनासाठी कोणत्या जातीच्या शेळींची निवड करावी ?
व्यावसायिक दृष्टिकोनातून शेळीपालन :
बकरी पालन व्यवसाय हा कमी खर्चात आणि सामान्य देखभालीवर गरीब शेतकरी आणि शेतमजुरांच्या उत्पन्नाचा चांगला स्रोत होत आहे. देशातील बर्याच राज्यात या शेळ्या त्यांना एटीएम म्हणून मदत करतात पण अद्याप माहिती नसल्यामुळे शेतकरी जास्त नफा मिळवू शकले नाहीत.अॅनिमल जेनेटिक्स अँड ब्रिडिंग विभागाचे डॉ. एम.के. सिंह याच्या म्हणण्यानुसार ,जर शेतकऱ्यांनी बकरी पालन हे वैज्ञानिक पद्धतीने केले तर त्यांचा दुप्पट होऊ शकतो.
हेही वाचा :
हेही वाचा :
जेव्हा आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून शेळीपालनाचा विचार करतो तेव्हा त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद सर्वात महत्वाची आहे . शेळीपालनच्या व्यवसायासाठी लागणारी गुंतवणूक हि ३ पद्धतीने उभारली जाऊ शकते.
१. जर तुमच्या घरामध्ये परंपरागत शेळ्या असतील तर तुम्ही त्यांचे संगोपन करून बकऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ करू शकता. परंतु या पद्धतीने तुमचा व्यावसायिक नफा सुरवातीला अतिशय कमी असेल त्याचबरोबर या प्रक्रियेला खूप कालावधी लागेल .
२. स्वतःची गुंतवणूक : स्वतःच्या गुंतवणुकीतून तुम्ही शेळीपालनाचा प्रोजेक्ट करू शकता.
३. तुम्ही व्यावसायिक कर्ज घेऊन शेळीपालनाचा व्यवसाय करू शकता . यासाठी खूप शासकीय योजना आहेत त्यांचा फायदा घेऊन तुम्ही भांडवल उभा करू शकता.
महाराष्ट्रामध्ये शेळीच्या कोणत्या प्रजाति आढळतात ?(Types Of Goats in Maharashtra)
- संगमनेरी शेळी
- उस्मानाबादी शेळी
- कोकण कन्याल
- सुरती (Khandeshi)
शेळीपालन व्यावसायिक कर्जासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट्स (Project Reports for Goat Farming)
१) १० नग शेळीपालन प्रोजेक्ट रिपोर्ट PDF डाउनलोड करा
२) २० नग शेळीपालन प्रोजेक्ट रिपोर्ट PDF डाउनलोड करा
३) ३० नग शेळीपालन प्रोजेक्ट रिपोर्ट PDF डाउनलोड करा .
४) ४० नग शेळीपालन प्रोजेक्ट रिपोर्ट PDF डाउनलोड करा.
५) ५० नग शेळीपालन प्रोजेक्ट रिपोर्ट PDF डाउनलोड करा.
६) १०० नग शेळीपालन प्रोजेक्ट रिपोर्ट PDF डाउनलोड करा.
७) २०० नग शेळीपालन प्रोजेक्ट रिपोर्ट PDF डाउनलोड करा.
शेळीपालनासाठी शेळीची निवड कशी करावी ?
जर आपण राज्यातील एकूण शेळीच्या जातींचा विचार केला तर उस्मानाबादी शेळीची जात ही मास आणि दुधासाठी उत्तम समजली जाते. परंतु शेळीपालनाध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे नवीन करडांची पैदास. पैदाशी साठी उत्तम नराची निवड करणे हि देखील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.
पैदाशीसाठी उत्तम नराची निवड कोणत्या निकषावर करावी ?
(Source- सकाळ च्या ऍग्रोवन ई पेपर )
1) नर हा कळपातील सुदृढ आणि जातीचे गुणधर्म दर्शविणारा असावा.
2) पैदाशीचा नर चपळ असावा.
3) पैदाशीचा नर निवडताना दोन जुळ्या नरांतील एक चांगला नर निवडावा, म्हणजे पुढील पिढ्यांत जुळी व तिळी करडे देण्याचे प्रमाण वाढते.
4) पैदाशीच्या नराची प्रजोत्पादन क्षमता चांगली असावी.
5) पैदाशीचा नर उंच, लांब, भरदार छाती असणारा व मानेवर आयाळ असणारा असावा.
6) पैदाशीच्या नरात कोणतेही शारीरिक व्यंग नसावे.
7) पैदाशीचा नर जातिवंत माता-पित्यांपासून झालेला असावा.
8) पैदाशीचा नर निवडताना जातीशी साधर्म्य असणारा, दीड ते दोन वर्षे वयाचा, जुळ्यांतील एक असणारा, सुदृढ, उत्तम प्रजोत्पादन क्षमता असणारा निवडावा, म्हणजे त्याच्यापासून जन्माला येणारी पुढील पिढी चांगल्या गुणवत्तेची होईल.
नोट - वर दिलेले प्रोजेक्ट रिपोर्ट्स हे संदर्भासाठी वापरता येऊ शकतील . त्याच बरोबर त्यामध्ये आवश्यक बदल करूनच प्रोजेक्ट लोन साठी बँक मध्ये जमा करता येतील.
आमचा लेख तुम्हला आवडला असेल तर सोशल सोशल मीडिया वर नक्की शेअर करा .
आजचे कांदा बाजारभाव
ReplyDeletehttps://bit.ly/3FBBD4K
आजचे सोयाबीन बाजारभाव
https://bit.ly/3BAGQYd
7387519956
ReplyDelete500+25 नग शेळीपालन प्रोजेक्ट रिपोर्ट PDF आहे का नीलम साठी
ReplyDeletePost a Comment