जाणून घ्या Mobile Blogging म्हणजे काय ?
आपल्यातील बऱ्याच लोकांना मोबाईल ब्लॉगिंगच्या संदर्भात जाणून घ्यायची इच्छा असेल. कारण प्रत्येकाकडे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप उपलबध असतोच असे नाही, परंतु सहसा प्रत्येकाकडे स्मार्ट फोन किंवा मोबईल असतोच. जेव्हा आपण पहिल्यांदाच ब्लॉगिंग सुरु करतो तेव्हा सुरवातीच्या काळात लॅपटॉप किंवा डेस्कटॉप घेणं बऱ्याचदा शक्य होत नाही. अशा वेळी मोबाईल वरूनच ब्लॉगिंग करनं सोईस्कर आहे.
आपल्यामध्ये बरेच लोक ब्लॉगिंगमध्ये करिअर करत आहेत. पण काही लोक हे छंद किंवा आवड म्हणून ब्लॉगिंग करतात . बऱ्याचदाअसे लोक आपल्या कामामध्ये खूप व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना वारंवार कॉम्पुटर समोर बसून लेख लिहायला वेळ मिळत नाही. अशा लोकांना मोबाईल वरून ब्लॉगिंग कसे करतात हे जाणुन घेण्यात रस आहे.
Source - freerangestock.com |
मोबाइलला ब्लॉगिंग साठी उत्तम platform कोणते आहेत ?
सोप्या भाषेमध्ये सांगयच झालं तर Blog म्हणजे अशी website जी तुम्ही सतत update करू शकता आणि सर्वात latest इन्फॉर्मशन ही तुमच्या वेबसाईटच्या पहिल्या Page वर उपलब्ध होते. सध्या इंटरनेटवर blogging साठी सर्वात उत्तम प्लॅटफॉर्म Google Bogger आणि Wordpress blogging हे आहेत. या दोन्ही प्लॅटफॉर्म वरून तुम्ही तुमची वेब साईट अगदी सहज publish करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही यांचे apps डाउनलोड करून अगदी विनामूल्य तुमचा ब्लॉग सुरु करू शकता.
आता आपण जाणून घेऊ की वरील वेब साईट नवीन ब्लॉगर का उपयुक्त ठरतात ?.
A) Blogger By Google ;
जे लोक पहिल्यांदाच Blogging सुरु करण्याचा विचार करत आहेत आशांसाठी Google Blogger हा अतिशय उत्तम आणि मोफत पर्याय उपलब्ध आहे.
Google Blogger Platform ची वैशिष्ट्ये ;
१. Google Blogger हा कोणत्याही मोबाइलला browser ला सपोर्टिव्ह आहे .
२. Google Blogging service ही मोफत आहे.
३. Google Blogger app हे खूप user friendly आहे.
B) Wordpress
Wordpress Mobile Blogging हा सुद्धा अतिशय लोकप्रिय platform आहे . Wordpress मध्ये तुम्हाला अनेक automation tools किंवा plugins वापरता येतात जे तुमचे काम खूप सोपे करतात. इथे तुमच्या वेब साईट च्या थीम साठी खूप सारे options उपलब्ध आहेत.
१. Wordpress ब्लॉगिंग हा १०० टक्के मोफत प्लॅटफॉर्म नाही . तुम्हाला तुमचा ब्लॉग stylish बनवायचा असेल तर काही tools हे विकत घ्यावे लागतात .
२. Wordpress मध्ये ब्लॉगरच्या तुलनेमध्ये जास्त सुविधा असतात .
मोबाइल ब्लॉगिंग चे फायदे आणि मर्यादा कोणत्या आहेत ?
मोबाईल ब्लॉगिंग चे फायदे ; Advantages of Mobile Blogging
१. मोबाईल ब्लॉगिंग चा सर्वात मोठा फायदा हा आहे कि तुम्ही कुठूनही तुमचा ब्लॉग लिहून Publish करु शकता. फक्त तुमच्याकडे Internet Connection असणं गरजेच आहे
२. मोबाईल ब्लॉगिंगमुळे तुम्ही तुमच्या लिखाणाला लोकांपर्यंत अगदी सहजरित्या पोहोचवू शकता.
३. Ads च्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळवू शकता .
मोबाइल ब्लॉगिंगच्या मर्यादा ; Limitations For Mobile Blogging
१. कॉम्प्युटरच्या तुलनेने Smart Phone ची स्क्रीन खूप छोटी असते त्यामुळे mobile वर सतत लेख लिहीणे कठीण आणि कंटाळवाणे असते.
२. मोबाईल ब्लॉगिंग यामध्ये customization चे ऑपशन्स खूप कमी असतात . जसे की theme , Color etc .
३. Mobile मध्ये कोणत्याही Topic संदर्भात research करणे कठीण असते.
४. मोबाइल वर Screen , keywords किंवा functionality सर्वच गोष्टींना मर्यादा असतात.
आशा प्रकारे तुमच्या हातामध्ये असणाऱ्या स्मार्ट फोनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्याजवळ असणाऱ्या एखाद्या विषयातील ज्ञानाला लेखांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवू शकता. त्याच बरोबर आर्थिक उप्तन्न देखील मिळवू शकता .
तुम्हाला जर आमचा हा लेख आवडला असेल तर Comment Box च्या माध्यमातूम आम्हाला नक्की कळवा आणि तुमच्या मित्रमंडळींना देखील शेअर करा .
Post a Comment