How To Promote Facebook Post/Page Free of Cost Information in Marathi ,Facebook Ads Manager, How to Promote Online Business on Facebook/Social Media   

            एक काळ होता जेव्हा उद्योजकांना त्यांच प्रॉडक्ट विकण्यासाठी दारोदार फिरावे लागत असे. प्रचंड पायपीठ केल्यानंतर सुद्धा केलेली गुंतवणून आणि त्यातून मिळणारा परतावा यामध्ये ताळमेळ घालणे ही देखील एक कसरत मनाली जायची. परंतु आज काळ बदलला आहे. आजचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. Facebook, Instagram, Linked In, Twitter , Youtube, WhatsApp यासारख्या अनेक सोशल साईट्स वरून आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात करू शकता. या सर्व माध्यमांमध्ये आताच्या घडीला फेसबुक हे प्रसाराचे सर्वात मोठे आणि प्रभावी माध्यम मानले जाते 



Facebook वर  आपण आपले प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस देखील ऑनलाईन अगदी मोफत प्रमोट करू शकतो.तुम्ही सुद्धा नक्कीच तुमच्या व्यावसायिक पोस्ट फेसबुक वर शेअर करत असाल. बऱ्याचदा आपल्याला असं जाणवत की आपण केलेली पोस्ट कितीही चांगली असली तरी जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचू शकत नाहीय. आज आम्ही तुम्हाला याच विषयावर माहिती देणार आहोत की फेसबुकवर एखादी व्यावसायिक पोस्ट केल्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत  कशी पोहचवता येईल (How to reach maximum people on Facebook)  आणि जास्तीत जास्त ट्राफिक कसं मिळवता येईल, तेही अगदी मोफत.  याच बरोबर आपण हेही जाणुन घेऊ कि तुमची व्यवसायिक पोस्ट तुमच्या भागातील लोकांपर्यंत कशी पोहचवता येईल(how to promote your business locally). 

आपली फेसबुक पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहचवाल ?

आज आम्ही तुम्हाला तुमची फेसबुक पोस्ट कशी वायरल करता येईल या संदर्भात मार्गदर्शन करणार आहोत. यासाठी अगदी साध्या सोप्या ट्रिक्स आणि टिप्सची माहिती देणार आहोत. या टिप्स जर तुम्ही फॉलो केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल.

1. आकर्षक शीर्षक बनवा (Create Attractive Heading )


उत्तम शीर्षक नेहमीच तुमच्या पोस्टकडे लोकांचं लक्ष वेधुन घेते. तुम्ही जर तुमच्या पोस्टचे हेडिंग हे Attractive आणि Short (थोडक्यात) बनवला तर नक्कीच तुमचे फॉलोवर तुमची पोस्ट लाईक आणि शेअर करतील. आणि या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचु शकता. 

२. ऍड पोस्ट टाईमिंग (Ad Posting  Time )


फेसबुक वर कोणतीही ऍड पोस्ट करताना एक गोष्ट नेहमीच लक्ष्यात घेतली पाहिजे ती म्हणजे Ad PostingTime. . तुम्हाला तुमचे फेसबुक फ्रेंड्स किंवा फॉलोवर कधी active असतात यासंदर्भात रिसर्च करून दिवसाच्या त्या वेळात तुम्ही तुमची पोस्ट करावी. साधारतः सायंकाळी ६ पासून ते १० वाजेपर्यंत  किंवा सकाळी लवकर पोस्ट केल्यास तुमची पोस्ट जास्तीत जास्त  लोकांपर्यंत पोहचु शकते. 
 

३. तुमची पोस्ट जास्तीत जास्त लोंकाना टॅग करा (Use Add Tags Options)


तुम्ही तुमची फेसबुक पोस्ट जास्तीत जास्त लोकांना टॅग करून तुमच्या फोटो किंवा विडिओला लाईक नक्कीच मिळवत असाल. याच पद्धतीने तुम्ही तुमच्या व्यावसायिक पोस्ट सुद्धा जास्तीत जास्त लोकांना Add Tags करू शकता. 

४. ग्रुप बनवा आणि अधिक लोकांना ऍड करा (Make Your FB Group )


फेसबुकवर कॉम्युनिटी ग्रुप बनवा आणि जास्तीत जास्त लोंकाना ऍड करा. त्यासाठी एखाद्या व्यावसायिक किंवा सामाजिक विषय घेऊन त्यावर कॉम्युनिटी ग्रुप बनवू शकता. तुम्ही जर ग्रुपचे ऍडमिन असाल तर तुमची पोस्ट आंऊन्समेंट करून जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचू शकता. 


५. ऍड लोकेशन (Use Add Location Option )


जर तुम्हाला तुमची व्यावसायिक पोस्ट विशिष्ट लोकेशन मधल्या लोकांसाठी असेल तर तुम्ही ऍड लोकेशनचा ऑप्शनचा उपयोग करू शकता. त्याच लोकेशन मध्ये असणाऱ्या तुमच्या फ्रेंड्सना तुमची ऍड पोस्ट टॅग करू शकता. या पद्धतीने देखील तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकता. 

६. क्रिएटिव्ह पोस्टर किंवा व्हिडीओ  बनवा (Make Creative Ad Poster or Videos )


तुम्ही तुमच्या व्यावसायिक पोस्टसाठी क्रिएटिव्ह पोस्ट बनवुन शेअर करू शकता. क्रिएटिव्ह पोस्टर्स आणि विडिओ बनवुन फेसबुक वर पोस्ट केल्यास त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो.  क्रिएटिव्ह  पोस्टर्स नेहमीच लोकांचं लक्ष वेधुन घेतात. 

७. क्रिएट फेसबुक पेज अँड  ऍड फॉलोवर (Create Facebook Page and Follower ) 


व्यवसायाच्या नावाने फेसबुक पेज बनवुन तुम्ही जास्तीत जास्त फॉलोवर जोडून तुमची व्यावसायिक पोस्ट त्या पेजवर शेअर करू शकता. त्या पेजच्या माध्यमातुन तुम्ही जास्तीत  जास्त लोकांपर्यंत पोहचु शकता.  

अशा प्रकारे तुम्ही तुमची व्यावसायिक पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी फेसबुक वर वरील सध्या आणि सोप्या ट्रिक्स वापरून जास्तीत जास्त लीड जनरेट करू शकता. सर्व सोशल मीडिया साईट्स मध्ये फेसबुक हे सर्वात जास्त प्रभावी आणि उपयोगी माध्यम आहे. आजकाल अनके व्यावसायिक याच प्रभावी माध्यमाचा वापर करून लाखो रुपयाचा व्यवसाय देखील करत आहेत . 

मित्रांनो तुम्हला जर आमचा हा लेख आवडला असेल तर खालील सोशल आयकॉन्स वर क्लीक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा . 

Post a Comment

Previous Post Next Post